Aapla Asa

'प्रेम'

प्रेम ही भावनाच अशी आहे की जिच्यावर मनापासून प्रेम करावं.

प्रेमाला कशाचंच बंधन नसतं.... ना वयाचं, ना वेळेचं, ना विचारांचं, ना वळणांचं.

एका हृदयात झंकारलेले कोमल सूर जेव्हा दुसरं हृदय कुठल्याही शब्दांविना किंवा कुठल्याही स्पर्शाविना ऐकतं, बस्स तिथेच प्रेम जमतं. 

विरोधाच्या वादळाला जुमानत नाही ते प्रेम. वळणांच्या रस्त्यावरही आपला मार्ग सोडत नाही ते प्रेम. दिलेल्या वचनासाठी कटिबद्ध असतं ते प्रेम.

तो - तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकताच अवतरलेला तो. अवखळ पण मनानं कणखर, कोवळा पण विचारांचा पक्का, हळवा पण साहसी.

ती - त्याच्यापेक्षा थोडे जास्तच पावसाळे बघितलेली. करारी, अनुभवी, प्रगल्भ पण मनाच्या कोपऱ्यात एकाकी पडलेली. बेधुंद प्रेमाला पारखी असलेली.

या दोन परस्पर विरोधी जणू दोन वेगळ्या ग्रहांवर असलेल्या दोघांना स्वप्नगंधीत प्रेमाचा अविष्कार एकत्र आणू शकेल? आपलं असं कुणीतरी असावं ही भावना दोघांच्याही हृदयाला गवसणी घालेल? दाट धुक्याच्या पडद्याआड असलेल्या क्षितिजावरच्या मोहक गुलाबी रंगात न्हाऊन निघतील का ते?

प्रेमाची व्याख्या बदलून टाकेल अशा अनोख्या प्रेमाची रोमहर्षक कादंबरी.