Tarang - Shant Ani Ashant

एक अल्लड तरुणी. निष्पाप, निष्कपट, आणि निरागस. आपण बरं आणि आपलं काम बरं अशा आपल्याच विश्वात रमणारी. योगायोगानं तिच्या आयुष्यात दोन तरूणांचं आगमन होतं आणि मग सुरू होतो तो निखालस मैत्रीचा एक बेधुंद करणारा प्रवास. लवकरच आयुष्य तिला अशा एका रस्त्यावर आणून सोडतं जिथं तिला एक अवघड आणि क्लिष्ट निर्णय घेणं भाग पडतं.

बघता बघता अशा काही घटना घडत जातात की अनपेक्षितपणे तिला कायद्याच्या चौकटीत उभं रहावं लागतं. झालेल्या एका खुनाची उकल करणं अशक्य होऊन बसतं आणि सुरू राहतो तो मनाचा कोंडमारा करणारा एक नकोसा कालखंड.

ती यातून निभावून जाऊ शकेल का? कोण तिला मदत करेल?

हळुवार प्रेमकथा आणि डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या रहस्यांचं जाळं विणणारी एक अनोखी कादंबरी.