Vighatak Pravrutti
जगाचा विनाश आता अटळ आहे.
तेजस्वी बुद्धिमत्ता असलेली एक व्यक्ती आयुष्यात आलेल्या एका भीषण अनुभवानंतर, शांततेचा त्याग करून एका भयानक उद्दिष्टाच्या अखंड पाठपुराव्यात गुंतून गेली आहे. जणू ती त्या ध्येयामागे धोकादायक आणि वेडी झाली आहे. या घातक प्रवृत्तीचे जगावर होणारे विनाशकारी परिणाम काय असतील याची जगाला अजून कल्पनाही नाही आहे. ते परिणाम इतके व्यापक, अराजक, आणि विध्वंस करणारे आहेत की ते जगाच्या अंताला कारणीभूत ठरू शकतात. ती वेडसर व्यक्ती जवळजवळ आपल्या ध्येयापर्यंत पोहोचली आहे. त्याचे ठिकाण शोधणे आणि त्याच्या योजना उधळून लावणे अत्यंत कठीण आहे.
या रहस्याचा भेद करून जगाला वाचवण्याचे धाडस कोण करेल?
फिलाडेल्फियाचा चतुर आणि धाडसी गुप्तहेर रेमंड प्रिन्स याच्यावर ही जबाबदारी येऊन पडते. तो ते आव्हान स्वीकारतो. पण त्याच्या मार्गात अनेक भयंकर संकटे उभी आहेत. या सर्वामागचा सूत्रधार कोण आहे हे त्याला माहीत नाहीच आहे शिवाय त्या वेडसर व्यक्तीने तयार केलेल्या गुप्त तंत्राबद्दलही तो अनभिज्ञ आहे. त्याला एका अशक्यप्राय गोष्टीशी सामना करावा लागणार आहे. याच्या मागावर जाताना एखादवेळेस त्याला अत्यंत प्रिय असलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा त्याग करावा लागेल का?
त्याला केवळ एका प्रबळ शत्रूविरुद्धच नव्हे, तर वेळेविरुद्धही लढावे लागणार आहे. शत्रूने आणि त्याच्या सामर्थ्यवान साथीदारांनी विणलेले जाळे उध्वस्त करावे लागेल. असे तो करू शकला तरच तो निष्पाप जगाला या निर्दयी पंजातून मुक्त करू शकेल.
ही केस नक्कीच रेमंडच्या धैर्याची कसोटी घेणार आहे आणि जगाला त्याच्याकडून अपेक्षा असेल की तो या भयंकर प्रतिस्पर्ध्याच्या घातक प्रवृत्तींचा मुकाबला करण्यासाठी तितकाच घातक बनेल.
तो यशस्वी होईल का? याचे उत्तर फक्त काळच देईल.
क्षणाक्षणाला रहस्य आणि भीतीचे जाळे विणणारी एक रोमहर्षक कादंबरी.